काही कल्पना, काही अनुभव व जगण्याच्या परीघातुन जरासे ऊंच जाणारे स्वप्न त्या उड्डाणातला थरार... तसेच कही स्वप्नांचा पत्त्यांप्रमाणे कोलमडणारा डोलारा व कोमेजलेल्या काही आठवणी...यांची साथ संगत करणार्या आणि आयूष्यातले अनेक रकाने भरणार्या काही सुंदर, उत्क्ट कविता...
Friday, January 29, 2010
Saturday, January 2, 2010
ती जाताना 'येते' म्हणून गेली
ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली !
म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली !
तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली
वार नखाचा हलके करून गेली !
घडे क्षणांचे रिते असे केले की
देहसुखाचा प्याला भरून गेली !
कळते हा बगिचा का फुलला माझा
काल म्हणे ती दारावरून गेली !
तसे पाहता पाउस तितका नव्हता
कळे न का ती इतकी भिजून गेली !
तिच्या भोवती गंध अता दरवळतो
सहवासचे अत्तर टिपून गेली !
अन जगण्याचे कारण बनून गेली !
म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली !
तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली
वार नखाचा हलके करून गेली !
घडे क्षणांचे रिते असे केले की
देहसुखाचा प्याला भरून गेली !
कळते हा बगिचा का फुलला माझा
काल म्हणे ती दारावरून गेली !
तसे पाहता पाउस तितका नव्हता
कळे न का ती इतकी भिजून गेली !
तिच्या भोवती गंध अता दरवळतो
सहवासचे अत्तर टिपून गेली !
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी....
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैश्यात् भावनेचा हा व्यापार पाहिला मी
अंधार वेढ्नांनी आक्रंद्तो तरीही
नज्ररेत् वासनेचा हा श्रंगार पाहिला मी
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी…..
ऱस्ते उन्हात् न्हाले सगळीकडे परंतू
वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी…..
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सुर्यही जरासा लाचार पाहिला मी
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी……
- अनिल कांबळे
एकदा माझी बायको म्हटली - संदीप खरे
एकदा माझी बायको म्हटली
आरश्यामध्ये बघत चंद्र
आणि चंद्रावरती लावत थीट....
बघ बघून कळलंच जर तर
जास्त झालंय भाजीत मीठ.....
एकदा माझी बायको म्हटली
चुकल्या वरती रडत राहीन,
माझे डोळे सरोवर....
तुझं सगळ खर
तरी माझंच सगलं बरोबर....
एकदा माझी बायको म्हटली
तू म्हणजे लुच्चा, लबाड
१ नंबर नतद्रष्ट...
उपकार करा, घरी या
काढून टाकीन म्हणते द्रुष्ट....
एकदा माझी बायको म्हटली
संपल सार, सुटलं सार
नाहीच आता जमायचं....
उंबरठ्याशी ये ना,
अडव... माळून फुल चाफ्याचं...
एकदा माझी बायको म्हटली
वाटत नाहीस माझा,
तरी माझ्याशिवाय नसलेला...
पाय धरत १७ वेळा
डोक्यावरती बसलेला....
- संदीप खरे
आरश्यामध्ये बघत चंद्र
आणि चंद्रावरती लावत थीट....
बघ बघून कळलंच जर तर
जास्त झालंय भाजीत मीठ.....
एकदा माझी बायको म्हटली
चुकल्या वरती रडत राहीन,
माझे डोळे सरोवर....
तुझं सगळ खर
तरी माझंच सगलं बरोबर....
एकदा माझी बायको म्हटली
तू म्हणजे लुच्चा, लबाड
१ नंबर नतद्रष्ट...
उपकार करा, घरी या
काढून टाकीन म्हणते द्रुष्ट....
एकदा माझी बायको म्हटली
संपल सार, सुटलं सार
नाहीच आता जमायचं....
उंबरठ्याशी ये ना,
अडव... माळून फुल चाफ्याचं...
एकदा माझी बायको म्हटली
वाटत नाहीस माझा,
तरी माझ्याशिवाय नसलेला...
पाय धरत १७ वेळा
डोक्यावरती बसलेला....
- संदीप खरे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे
एकटा दगडावरी बसुनी कधीचा पाहतो
कैक थकले थांबले हा मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही शून्य वाटे पंथ ही
शून्य वाटे साथ कुणी ना तयाची खंत ही
शून्यताही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे
लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळा
लक्ष ही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोम-रोमी जो शहारा पेरतो
तोच वादळवाट तो अन् तो किनारा वाटतो
ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे
जीव जडता देतसे जो जीवलगावर जीवही
ज्या स्तुतीही सारखी अन् सारखे आरोपही
झेलतो अन् पेलतो जो दीपकाचे तेजही
अन् दिव्याखाली जमे तो पोरका काळोखही
मान-गर्वा पार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे
शोधते निष्पापता त्या लोचनांचे आरसे
पौर्णिमा ज्याच्या मनातून चंद्र घेऊन जातसे
तीर्थनेत्री दाटताना प्रहरशीतल व्हायचे
जन्म मृत्यू पार जाऊन पोचलो वाटायचे
उत्कटाच्या ऊन्ह छायेतून घर बांधायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे
Subscribe to:
Comments (Atom)