भार होता पापण्यांना, आसवे ढाळून घ्यावी..
तोडूनी भवपाश सारे, भावनाना वाट द्यावी.....
रिक्त हलका उर होता, श्वास घ्यावा खोल दीर्घ..
दु:खभारा फ़ेकण्या मग, सुखक्षणान्ची साथ घ्यावी....
मुक वाचा स्तब्ध भाषा, व्यर्थ सारे सोसणे हे
जीव घेते जी व्यथा ती, का उराशी बाळगावी....?
का उगा होउन विद्ध, कष्टवावे अन्तराला?
भाववेड्या वेदनेला, स्वप्नवेडि साद द्यावी...
झेलण्याचे सुख आहे..का व्यथेचा ध्यास घ्यावा?
लाघवी त्या स्पंदनाना,सर्वव्यापक द्रूष्टी द्यावी.......

No comments:
Post a Comment