रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो..
तुमची आई बहिण आजही विटनबली जातेय हाटाहाटातून .
मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नियोग , आजही
मेणबत्तीसारखी जाळतात माणसं चौकाचौकातून.
तील्कातले हात सळसळलेच तर छाटले जातात कोपरापसून.
अरे ..रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो.
किती दिवस ..किती दिवस सोसायाची अशी घोर नाकेबंदी.
मरेपर्यंत रहायच का असं ..युद्धकैदी !!!
ती पहा रं ती पहा ..मातीची अस्मिता आभाळ भर झालीये .
माझ्या यातानांनी आता झिंदाबाद ची गर्जना केलीये
तेंव्हा ..रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
आता या शहराशहराला आग लावीत चला !!!!!!
--नामदेव ढसाळ

No comments:
Post a Comment