Sunday, November 1, 2009

तू तलम अग्नीची पात...


.
.
तू तलम अग्नीची पात जशी दिनरात झळावी मंद
तू बंध मुक्त स्व्च्छंद जसा रानात झरा बेबंद
.
तू अल्लड नवथर थरथर देही जसे थरथरे पाणी
या पाण्यावरला तरंग मी अन भास वेगळा राणी
.
रानात बहर अंगात बहरले धुंद फुंद ते श्वास
मीलनी मस्ग ते सर्प जसे की टाकतात निश्वास
.
.
ना. धो. महानोर

No comments:

Post a Comment